• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर विधानसभा भाजपा वेट अँड वॉच वर

by Guhagar News
October 24, 2024
in Politics
326 4
0
BJP on wait and watch
641
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकणचे पालक सा. बां.मंत्री सन्मा.नाम.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासमोर ठेवला विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा

गुहागर, ता. 24 : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा रंगत चाललेली असतानाच कोकणचे पालक सा. बा.मंत्री नाम. सन्मा.रविंद्रजी चव्हाण साहेब यांनी काल पुर्ण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी बरोबर संवाद साधला असता गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुती लढणार असून महायुतीचाच विजय होणार आहे असे संकेत दिले असल्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपा वेट अँड वॉच भूमिकेत आहे. मात्र पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते हे गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपाने लढवण्यासाठी आग्रही आहेत. BJP on wait and watch

शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने लढावा आणि महायुतीतून तो विजयी व्हावा, अशा प्रकारच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाने गुहागर मध्ये येऊन दिल्याने येथील मागील अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वेगाने भाजपाच्या कामाला लागले होते. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वात महायुतीच्या विजयाचे वातावरण या मतदारसंघात निर्माण झाले आहे. असे असताना आजपर्यंत महायुतीतून गुहागर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला याबाबत गुप्तता पाळण्यात आली असल्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे थोडे चल बिचल झालेले असताना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कायमस्वरूपी बळ देणारे कोकणचे पालक आणि राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच रत्नागिरी येथे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. BJP on wait and watch

मात्र यावेळी ही चव्हाण साहेबांनी ही सीट महायुती लढणार आणि जिंकणार असेच सांगितले. त्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी वेट आणि वॉचवरच राहिली आहे. मात्र यामुळे महायुतीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्ष या विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीतुन नेतृत्व करणारे नातू घराण्यातील स्वर्गीय तात्या, विनयशील नेतृत्व विनयजी नातू आणि स्वर्गीय आमदार रामभाऊ बेंडल यांचे पुत्र, माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेले राजेश बेंडल यांनी पालकमंत्री सन्मा. नाम. उदयजी सामंत यांच्यामार्फत नुकताच केलेला शिवसेना प्रवेश यामुळे गुहागर विधानसभेतील उमेदवारी बाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. येथील भारतीय जनता पार्टी मात्र ही जागा भारतीय जनता पार्टीच्याच पारड्यात पडणार यावर ठाम आहे. BJP on wait and watch

मागील २ वर्षात भाजपाने या गुहागर विधानसभेतील सर्व मतदान केंद्रांवरती केलेलं काम, कार्यकर्त्यांना दिलेल बळ, त्यांच्या तना आणि मनात संचरवलेला उत्साह यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात येथे महायुती 100% विजय होऊ शकते याची खात्री येथील भाजप पदाधिकाऱ्यांना आहे. मात्र जर यावेळी पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही विधानसभेमध्ये  भारतीय जनता पार्टीला आणि कमळ निशाणीला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही तर मात्र याचे दूरगामी परिणाम या जिल्ह्यात निवडणुकांवर होतील, भारतीय जनता पार्टीच्या प्रचार आणि प्रसारावरती पण होतील अशी चर्चा पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रंगू लागली आहे. BJP on wait and watch

Tags: BJP on wait and watchGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share256SendTweet160
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.