• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात बोंडला स्पर्धा संपन्न

by Ganesh Dhanawade
October 17, 2024
in Guhagar
121 1
2
Bondla Competition at Velneshwar College
238
SHARES
680
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रेरणा शिंदे व श्रावणी मेस्त्री ग्रुप प्रथम

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे बोंडला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा.राधिका कदम यांनी काम पाहिले. Bondla Competition at Velneshwar College

नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव! खंडेनवमी पूजन कार्यक्रमाचे औचित्य साधून ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. निसर्गातील पानाफुलांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक बोंडले साकारले. आधुनिकतेचा आग्रह धरताना आपली परंपरा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी, विद्यार्थ्यांच्या अंगी अवगत असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेरणा शिंदे व श्रावणी मेस्त्री या ग्रुपने पटकाविला. द्वितीय क्रमांक कु.इशा हेगशेट्ये व कु.अक्षता कदम यांनी तर तृतीय क्रमांक कु. गौरव तेरेकर व कु.मानस विचारे या ग्रुपने मिळविला. स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा.केतन कुंडीया व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. Bondla Competition at Velneshwar College

Tags: Bondla Competition at Velneshwar CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.