गुहागर, ता. 15 : मागाठाणे विधानसभा आमदार प्रकाशदादा सुर्वे व युवा कार्यकारीणी यांच्या संकल्पनेतून तसेच शीर गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सचिन टक्के यांच्या सचिन सामाजिक व शैक्षणिक संस्था मुंबई यांच्यातर्फे आदर्श केंद्रशाळा शीर नंबर १ येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials to Sheer School
गेली अनेक वर्ष श्री. सचिन टक्के यांच्या संस्थेतर्फे विविध शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात येत आहेत. तसेच तरुणांना व्यावसायिक संधी उपलब्ध व्हावी याच्यासाठी या संस्थेमार्फत विविध उपक्रम घेतले जात आहेत. यावेळी विजय ताम्हणकर यांच्या माध्यमातून सचिन टक्के यांनी शाळेला वॉटर प्युरिफायर ही उपलब्ध करून दिला. Distribution of educational materials to Sheer School
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक गुरव, संस्थेचे अध्यक्ष सचिन टक्के, बाळकृष्ण शिर्के, संदेश भाटकर, राहुल पवार, अमित साळवी, हेमंत गुरव, विद्याधर गुरव, अनिल बेर्डे, सुरेश टक्के, संदेश वाटकर, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, शिक्षक प्रमोदिनी गायकवाड, मृणाली रेडेकर, अजय खेराडे अंगणवाडी सेविका लक्ष्मी शिर्के तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. Distribution of educational materials to Sheer School