गुहागर, ता. 01 : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली यांचे मार्फत दिला जाणारा 2024 -25 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार चिपळूण तालुक्यातील दलवाई हायस्कूल मिरजोळीच्या उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांना मिळाला असून रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सौ. रागिनी पराग आरेकर यांना सन्मानित करण्यात आले. Ideal Teacher Award to Ragini Arekar

दलवाई हायस्कूल या प्रशालेमध्ये बारा वर्षे विज्ञान विषयाचे अध्यापन करणाऱ्या सौ.आरेकर यांनी विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी सतत विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन त्यांना राज्यस्तरापर्यंत यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर स्वतःची शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी त्यांनी मुंबई विद्यापीठाची विज्ञान शाखेतील मास्टर ऑफ सायन्स ही पदव्युत्तर पदवी घेतली व या परीक्षेत डी. बी. जे. कॉलेज मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक श्री .रोहित जाधव, सर्व शिक्षक वृंद तसेच संस्था चालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Ideal Teacher Award to Ragini Arekar
