श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय आणि ज्यु. कॉलेज येथे संपन्न
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पालशेत विद्यालय येथे दि. २५/०९/२०२४ रोजी ‘तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत मा.श्री.पी.व्ही.कपाडीया अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गुहागर यांचे ”पिडीत व्यक्तीसाठी नुकसान भरपाईच्या योजना’ या विषयावर तसेच सौ.एम.एन.सोमण पॅनल विधीज्ञ यांचे ‘स्वच्छता विषयी जनजागृती’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. Legal Guidance in Palashet
सर्वप्रथम ‘स्वच्छता जनजागृती’ विषयावर बोलताना विधीज्ञ सौ. सोमण मॅडम यांनी स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना स्वत:हून आपण स्वच्छतेचे नियम आत्मसात केले पाहिजेत हे सांगताना घरपरिसरातून ते बाह्य परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची प्रतवारी करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे या गोष्टींवर भर दिला. Legal Guidance in Palashet
अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती गुहागर तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, गुहागर मा. श्री. कपाडिया सर यांनी ‘पिडीतांच्या समस्या आणि नुकसान भरपाई’ विषयावर मार्गदर्शन करताना समाजातील वंचीत पिडीत घटकांना शासकीय योजनांमार्फत मदतीचा हात कसा मिळतो, त्याकरीता कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करावा यावर सविस्तर चर्चा केली. निसर्ग निर्मित तथा मानवनिर्मित आपत्तींपासून होणारे नुकसान आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी असणाऱ्या शासकीय योजना यांचे यथोचित मार्गदर्शन देखील त्यांनी केले. Legal Guidance in Palashet
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विचारे सर यांनी केले. सदर कार्यक्रमास मा. मुख्याध्यापक श्री.जोगळेकर तथा सर्व प्राध्यापक वर्ग हजर होते. कार्यक्रमाचे आभार श्री. पाटील सर यांनी मानले. कार्यक्रमास मा. दिवाणी न्यायालय गुहागरचे कर्मचारी श्री.राजेश चिपळूणकर, श्री.सुनिल माने व श्री. निसार खेरटकर उपस्थित होते. Legal Guidance in Palashet