रत्नागिरी, ता. 21 : वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिपळूण येथील बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग आज शनिवार दि. 21/09/2024 रोजी 13 ते 20 वा. पर्यंत बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून बहाद्दुरशेख नाका पॉवर हाऊस – चिंचनाका तसेच चिंचनाका पॉवर हाऊस बहाद्दुरशेख नाका या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात यावी, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. Chiplun Bahadursheikh Naka to Chinchanaka closed
मोटार वाहतूक बंद करण्याबाबत आज प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, अजित पवार, उपमुख्यमंत्री म.रा. मुंबई यांचा चिपळूण पोलीस ठाणे हद्दीमध्ये संभाव्य दौरा नियोजित आहे. सदर वेळी बहाद्दुरशेख नाका ते जिप्सी कॉर्नर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार असुन इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्रासमोरील पटांगणात सभा होणार आहे. सदर सभा व रॅलीस वेळी सुमारे 5000 ते 6000 जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे समजून येते. सदर अतिमहत्वाच्या व्यक्ती, सभा व रॅली कार्यकमाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड हा चिपळूण शहराचा मध्यवर्ती रोड असुन सदर रोडवर वाहतुकीची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. Chiplun Bahadursheikh Naka to Chinchanaka closed
तरी सदर कार्यक्रमाकरीता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कायदा व सुव्यवस्था दृष्टीकोनातुन बहाद्दुरशेख नाका ते चिंचनाका रोड व चिंचनाका ते बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा मार्ग दि. 21/09/2024 रोजी 13.00 ते 20.00 वा. पर्यंत बंद करुन सदर मुदतीत बहाद्दुरशेख नाका पॉवर हाऊस चिंचनाका तसेच चिंचनाका पॉवर हाऊस बहाद्दुरशेख नाका असा रहदारीचा पर्यायी मार्ग करण्याबाबत आदेश होणेस विनंती केली आहे. यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे. Chiplun Bahadursheikh Naka to Chinchanaka closed