‘रॅगिंग विरोधी कायदे व वाहतूक नियम’ या विषयावर संपन्न
गुहागर, ता. 28 : शृंगारतळी येथील रिगल कॉलेजमध्ये (Regal College) तालुका विधी सेवा समिती गुहागर मार्फत तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष व गुहागर दिवाणी न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया यांचे रॅगिंग विरोधी कायदे या विषयावर तर पॅनल विधीज्ञ श्री. एस. जी. अवेरे यांचे वाहतूक नियम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. Legal Guidance at Regal College
यावेळी रिगल कॉलेज प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये रिगल कॉलेज शृंगारतळी येथे उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक कोर्सेसची माहिती दिली व त्यानंतर श्री. पी. व्ही. कपाडिया व श्री. एस. जी. अवेरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. आपल्या ‘वाहतूक नियम’ या विषयावर श्री. अवेरे यांनी मोटर वाहन कायदा 1 जुलै 1988 अंतर्गत असलेल्या विविध नियमांची ओळख करून दिली. तसेच वाहतूक शाखेची कर्तव्ये व त्यांना असलेल्या विविध अधिकारांबद्दल विस्तृतपणे माहिती दिली. Legal Guidance at Regal College
दिवाणी न्यायाधीश श्री. पी. व्ही. कपाडिया यांनी आपल्या ‘रॅगिंग विरोधी कायदे’ या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये रॅगिंग विरोधी कायदा 1999 याची माहिती दिली. याअंतर्गत रॅगिंग म्हणजे काय, तसेच रॅगिंग झाल्यावरती विद्यार्थ्यामार्फत कोण तक्रार करू शकतो. रॅगिंग केल्यावर असलेल्या कायदेशीर शिक्षा याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर सेंटर फॉर युथ या वेबसाईटची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे तसेच जनजागृती करणे हा या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्राध्यापिका सोनाली मिरगल यांनी केले. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे न्यायालयीन कर्मचारी श्री. राजेश चिपळूणकर, श्री. नागोराव सरकुंडे, श्री.निसार खेरटकर, रीगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. Legal Guidance at Regal College