26 ऑगस्ट पासून रत्नागिरी येथे आमरण उपोषण सुरू
गुहागर, ता. 23 : कोकणात काय नको या विषयावर भरपूर आंदोलने होतात पण कोकणाला नेमके काय हवे हे सांगणारे पहिले सकारात्मक आंदोलन राजापूर येथे आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केले. 500 हून अधिक आंबा बागायतदार शेतकरी या आंदोलनात उपस्थित राहिले. ज्या पद्धतीने राळेगण शिंदी, पुणतांबा येथून मोठे आंदोलन झाली असेच कोकण प्रदेशाचे मोठे आंदोलन आज भू या निसर्ग समृद्ध गावांमध्ये सुरू झाले. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village
गेली दहा वर्ष चक्रीवादळे कोरोना ग्लोबल वॉर्मिंग यामुळे कर्जबाजारी झालेल्या आंबा बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी. राज्याला डॉलर्स मिळवून देणारा कोकणातील मच्छीमार 15000 कोटीचे अर्थव्यवस्था या मच्छीमारांना एकदा संपूर्ण कर्जमाफी मिळावी ही मागणी शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी लावून धरली. महाराष्ट्र राज्याला एकूण 40 टक्के उत्पन्न कोकण प्रदेश देतो तरीही कोकणातील मुख्य विषयांना गेली 78 वर्ष प्रत्यक्ष निधी दिला जात नाही, आंबा काजू बोर्ड प्रत्यक्ष निधी नाही चालू झाले, महाराष्ट्र फिशरीज कार्पोरेशन 0 बजेट आहे आणि कोकण पर्यटनाच्या विषयांमध्ये आनंदी आनंद आहे. या तिन्ही विषयासाठी प्रत्येकी 1000 कोटी बजेट राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी मिळावे, असा आग्रह यावेळी या आंदोलनाचे मुख्य समन्वयक संजय यादवराव यांनी धरला. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village
माकडांच्या समस्येमुळे कोकणातील शेती उध्वस्त व्हायची वेळ आली आहे, कोणतीही शेती करता येत नाही आता माकडे घरात शिरून वस्तू नेऊ लागली या माकडांवर नियंत्रण आणले पाहिजे त्यांचे नीर्बीजीकरण केले पाहिजे आणि त्यांना सह्याद्रीच्या अभयारण्यांमध्ये सोडून दिले पाहिजे अशी मागणी सर्व सामान्य शेतकऱ्यांनी यावेळी केली. ऊस साखर कापूस सोयाबीन सर्वांना हमीभाव मिळतो हजारो कोटी दरवर्षी महाराष्ट्र सरकार कर्ज करतात पण कोकणातल्या सुपारीला आणि काजू बिला हमीभाव मिळत नाही तो मिळाला पाहिजे ही मागणी यावेळी करण्यात आली. विनय सरफरे, नीलम वालम, वसंत तांबे हे तरुण आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आडिवरे गावातील धोंडू शिंदे हे 86 वर्षाचे शेतकरी या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. 26 ऑगस्ट पासून या मागण्या प्रत्यक्ष मान्य होईपर्यंत आणि जीआर निघेपर्यंत कोकणातील शेतकरी बेमुदत आंदोलन रत्नागिरी येथून सुरू करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच मागण्या घेऊन आमरण उपोषण समृद्ध कोकण संघटना सुरू करत आहे. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village
विधानसभेची निवडणूक लग्न बार्शी पूजा साखरपुडे पाखाड्या साकव आणि उखडणारे डांबरी रस्ते यापेक्षा कोकण विकासाच्या मूलभूत विषयांवर व्हावी, असा आग्रह या आंदोलनाचे प्रमुख संजय यादवराव यांनी धरला आहे. जे कोकण विकासासाठी काम करतात किंवा भविष्याचे काम करतील असेच लोकप्रतिनिधी कोकणातून निवडून आले पाहिजेत यासाठी कोकणी माणसाने जागरूक झाले पाहिजे. यापुढे कोकणात भुलभुलय्या करणारी भाषणे यापेक्षा कोकणातील शेतकरी कोकणातील आंबा काजू बागायतदार आणि मच्छीमार यांना कशी मदत करणार यावर राज्यकर्त्यांनी बोलले पाहिजे असा आग्रह यावेळी देण्यात आला. आंदोलन सरकारच्या किंवा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून गेली ७८ वर्ष कोकण प्रदेशावर अन्याय करणाऱ्या शासकीय व्यवस्थेच्या विरोधात आहे. यापुढे कोकणावरील अन्याय चालणार नाही सीआरझेड पर्यटन वॉटर स्पोर्ट्स बॅक वॉटर टुरिझम हाऊस बोट वाळू उद्योग चिरेखाने कोकणच्या साधन संपत्तीवर आधारित असलेले उद्योग यांना सहजपणे परवानगी मिळाल्या पाहिजेत, जिल्हास्तरावर परवानगी मिळाल्या पाहिजेत असा आग्रह यावेळी करण्यात आला. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village
भु गाव च्या ग्रामदेवतेची पूजा करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. ग्रामदेवतेपासून भू बाजारपेठेपर्यंत कार्यकर्त्यांची रॅली आणि त्यानंतर बाजारपेठेमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. खिणगिणि भू येथे प्रत्यक्ष उपोषणाचा कार्यक्रम विजय सरफरे यांच्या आंब्याच्या बागेत सुरू झाला. आंब्याचे आंदोलन आंब्याच्या बागेतून ही अभिनव संकल्पना यावेळी सुरू झाली. या गावचे नागरिक संजय सरफरे, मंदार सप्रे विनय सरफरे यांनी स्थानिक नियोजनामध्ये खूप परिश्रम घेतले. यावेळी भू गावचे सरपंच पेंडखळे गावचे सरपंच, मच्छीमार व्यावसायिक हाजी शहानवाज आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईतून राजश्री यादवराव, संदीप शिरधनकर,,खेडेकर बर्वे आणि अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी जावळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, आज राजापूर मध्ये शेकडो शेतकरी उपस्थित राहिले रत्नागिरीमध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात उतरतील असे आंदोलनाचे प्रमुख प्रदीप उर्फ बावां साळवी यांनी जाहीर केले. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village
26 ऑगस्ट पासून मोठ्या प्रमाणात भव्य स्वरूपात आमरण उपोषण रत्नागिरी येथे सुरू होईल. यात कोकणातील शेतकरी बागायतदार पर्यटन व्यवसायिक व्यापारी उद्योजक यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन समृद्ध कोकण संघटनेकडून यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष युयुतसू आरते यांनी केले. ज्या आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आणि याचा प्रत्यक्ष जीआर निघेपर्यंत आमरण उपोषण चालू राहील, असा निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला. Movement of Bhoomiputra from Rajapur Bhu Village