• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यामध्ये नवीन मतदार नोंदणीस प्रारंभ

by Ganesh Dhanawade
August 13, 2024
in Politics
173 1
0
New voter registration starts in Guhagar Taluka
339
SHARES
969
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविणेचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात नवीन मतदार नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्षाच्या सन्माननीय पदाधिकारी यांची बैठक शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय गुहागर येथे आयोजित करण्यात आली. New voter registration starts in Guhagar Taluka

गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३२२ मतदान केंद्राचा समावेश आहे. 6 ऑगस्ट रोजी सर्व केंद्राची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती (अर्ज) स्विकारण्याचा कालावधी 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट असा आहे. त्याअनुषंगाने सदरचे अर्ज स्विकारणेसाठी १७ ऑगस्ट, २०२४ (शनिवार), १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) या दिवशी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे उपस्थितीत विशेष शिबीर आयोजित केले आहे. New voter registration starts in Guhagar Taluka

नवीन नाव नोंदणी (नमुना ६), नाव वगळणी (नमुना ७), दुरुस्ती व दुबार इपीआयसी(नमुना ८) अशा स्वरुपाचे अर्ज भरता येणार आहेत. विशेष मोहिमे बरोबरच दि. २०/०८/२०२४ पर्यत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालय तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज करता येतील. याबाबत राजकिय पक्षाचे उपस्थित पदाधिकारी यांना देखील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहीती देण्यात आली. तरी जास्तीत जास्त नवमतदारांनी तसेच नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांनी केले आहे. New voter registration starts in Guhagar Taluka

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNew voter registrationNew voter registration starts in Guhagar TalukaNews in GuhagarPoliticsUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.