प्लास्टिक पिशव्या व ट्राफिक जाम बाबत दिली व्यापाऱ्यांना समज
गुहागर, ता. 11 : शृंगारतळी ही तालुक्याची मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेला तालुक्याची आर्थिक राजधानी समजले जाते. राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. मात्र या बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर चालू होता. तसेच या ठिकाणी महामार्गावर छोटे व्यावसायिक आपल्या हातगाड्या लावून व्यवसाय करीत आहेत. यामुळे येथे “ट्राफिक जाम” होते. काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने याच पार्श्वभूमीवर पाटपन्हाळे ग्रामपंचायतने बाजारपेठेत धडक देवून व्यापाऱ्यांना याबाबत समज दिली. Gram Panchayat focused on plastic ban
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतून प्लास्टिक बंदी व येथे ट्राफिक सुरळीत होण्याकरिता पाटपन्हाळे ग्रा.पं. चे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसीम साल्हे, चंद्रकांत तेलगडे, रुपेश राऊत, शब्बीर शेख, अस्मा साल्हे, सिद्धी जाधव, चैताली कदम, ग्रा.वि. अधिकारी सुलभा बडद, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, ग्रा.पं. सर्व कर्मचारी या उपक्रमामध्ये सामील झाले होते. यावेळी प्लास्टिक बंदीवर लक्ष केंद्रित करून काही प्रमाणत प्लास्टिक पिशव्या जमाही केल्या व समजही देण्यात आली. Gram Panchayat focused on plastic ban
हात गाडीवाल्याना आपल्या गाड्या पाठीमागे उभ्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या. सदर दिवशी शनिवार असल्याने या ठिकाणी आठवडा बाजारातही आपली दुकाने महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही तसेच एखादा अपघात होणार नाही या संदर्भातही सुचना करण्यात आल्या. बाजारपेठेमध्ये रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना तेथून उठवून मच्छीमार्केटमध्ये जाण्याच्या सूचना केल्या. तसेच तालुक्त्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या वडाप संघटनांशी पार्किंग संदर्भात चर्चा करण्यात आली. Gram Panchayat focused on plastic ban