तालुक्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत
गुहागर, ता. 10 : मा. भारत निवडणूक आयोगाने दि. ०१/०७/२०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षणाचा दुसरा कार्यक्रम राबविणेचा सुधारीत कार्यक्रम दि. ०१/०८/२०२४ रोजी जाहीर केला आहे. त्यानुषंगाने गुहागर विधानसभा क्षेत्रातील सर्व राजकीय पक्षाच्या सन्माननीय पदाधिकारी यांची बैठक श्री. शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय गुहागर येथे आयोजित करण्यात आली होती. Voter List Special Registration Camp
गुहागर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ३२२ मतदान केंद्राचा समावेश आहे. दिनांक ०६/०८/२०२४ रोजी सर्व केंद्राची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती (अर्ज) स्विकारण्याचा कालावधी ०६/०८/२०२४ ते २०/०८/२०२४ असा आहे. त्याअनुषंगाने सदरचे अर्ज स्विकारणे साठी दि. १० ऑगस्ट, २०२४ (शनिवार ), दि. ११ ऑगस्ट २०२४ (रविवार) व दि. १७ ऑगस्ट, २०२४ (शनिवार), १८ ऑगस्ट, २०२४ (रविवार) या चार दिवशी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे उपस्थितीत विशेष शिबीर आयोजित केले आहे. नवीन नाव नोंदणी ( नमुना ६ ), नाव वगळणी ( नमुना ७), दुरुस्ती व दुबार EPIC ( नमुना ८ ) अशा स्वरुपाचे अर्ज भरता येणार आहेत. Voter List Special Registration Camp


या विशेष मोहिमे बरोबरच दि. २०/०८/२०२४ पर्यत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसिल कार्यालय तसेच voters.eci.gov.in या संकेतस्थळावर देखील अर्ज करता येतील. याबाबत राजकिय पक्षाचे उपस्थित पदाधिकारी यांना देखील मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहीती देण्यात आली. तरी जास्तीत जास्त नवमतदारांनी तसेच नागरीकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. शिवाजी जगताप, मतदार नोंदणी अधिकारी, २६४ गुहागर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी खेड यांनी केले. Voter List Special Registration Camp