गुहागर, ता. 07 : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक निधी अंतर्गत आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ येथे शीर ग्रामपंचायतीतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. आर. देवकाते यांनी ग्रामपंचायतीतर्फे प्रतिवर्षी गावातील सर्व शाळांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असल्याचे तसेच भौतिक गरजांची पूर्तता करण्यात येत असल्याचे सांगितले. Educational material to students by Sheer Gram Panchayat
शीर ग्रामपंचायतचे सरपंच विजय धोपट, उपसरपंच रामचंद्र पवार, पोलीस पाटील पूर्वा भाटकर, ग्रामविकास अधिकारी एम.आर. देवकाते तसेच तंटामुक्ती अध्यक्ष गणपत ठोंबरे, प्रतिष्ठित नागरिक शंकर मोरे, नारायण मोरे, टी. डब्ल्यू.जे. या संस्थेचे प्रतिनिधी आशिष कांबळे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. शीर गावच्या पोलीस पाटील पूर्वा भाटकर यांनी ग्रामपंचायत विद्यार्थ्यांसाठी एवढा खर्च करत आहे तर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून याची परतफेड करावी, असे आवाहन केले. Educational material to students by Sheer Gram Panchayat
मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी यावर्षी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची दप्तरे दिल्याबद्दल तसेच शाळेला नेहमीच ग्रामपंचायतीतर्फे सहकार्य होत असल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अमराळे यांनी केले. यावेळी शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड, मृणाली रेडेकर ग्रामपंचायत लिपीक सतीश पवार, कर्मचारी महेश पवार उपस्थित होते. Educational material to students by Sheer Gram Panchayat