• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यात पावसाचा जोर कायम राहणार

by Guhagar News
August 6, 2024
in Ratnagiri
343 4
0
Rain continues in the state
674
SHARES
1.9k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई, ता. 06 : राज्यात पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.  कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain continues in the state

मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मीमी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूर, पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व तुरळक ठिकाणी वादळी वाढत पाऊस पडण्याची शक्यता शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भात सहा ते आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. Rain continues in the state

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRain continues in the stateUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share270SendTweet169
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.