• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पं.स.कृषी विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

by Manoj Bavdhankar
July 27, 2024
in Guhagar
139 2
9
Planting ragi at Madhal
274
SHARES
782
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मढाळ येथे बचत समुहाने केली एक एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड

गुहागर, ता. 27 : वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे दिवसेंदिवस शेतकरी शेती करण्यापासून दुरावत असताना पंचायत समिती गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मढाळ येथील ओंकार स्वयंसहाय्यता समुह व सरस्वती स्वयंसहाय्यता बचत समुहाने एकत्र येत सामुहिक नाचणी लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. Planting ragi at Madhal

रत्नागिरी जिल्ह्यातील भात व नाचणी ही खरीप हंगामातील प्रमुख पिके असून गुहागर तालुक्यात पूर्वी  रानोमाळ नाचणीचे पिके घेतली जात होती. मात्र वानर-माकडांसोबतच रानडुक्कर व रानरेड्यांच्या उपद्रवामुळे  सातत्याने नुकसान सहन करण्यापेक्षा काही शेतक-यांनी नाचणीची शेतीच सोडून दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील नाचणी पिकाचे क्षेत्र कमी होत चाललंय. काही गावात तर पिक कापणी प्रयोगासाठी नाचणी पिकच सापडेनासे झाले आहे.  मात्र आहारात महत्वाचे  पौष्टिक स्थान असलेले नाचणी हे पिक शेतक-यांनी टिकवणे आवश्यक  आहे. यासाठी पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून सातत्याने वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम व प्रात्यक्षिक आयोजित करून शेतक-यांना मदत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अशातच सामुहिकपणे अशा पिकांची लागवड केल्यास व संरक्षण केल्यास रानटीप्राण्यांपासून पिक वाचविणे  सोपे होईल  हा विचार करून पंचायत समिती गुहागर ने प्रात्यक्षिक स्तरावर कोतळूक व मढाळ  या गावात  बचत समूहाच्या माध्यमातून हा उपक्रम  केला आहे. Planting ragi at Madhal

या  उपक्रमांतर्गत मढाळ येथील ओंकार स्वयंसहाय्यता समुह व सरस्वती स्वयंसहाय्यता समुहाने सुमारे एक एकर क्षेत्रावर नाचणी लागवड केली आहे. पंचायत समितीकडून  या प्रात्यक्षिक उपक्रमासाठी लागवडीसाठी लागणारे रासायनिक खत ( 19:19:19)  उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी  प्रत्यक्ष उपस्थित राहून महिला  शेतक-यांना आवश्यक मार्गदर्शन केले. Planting ragi at Madhal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPlanting ragi at MadhalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.