संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आवरे येथील रॉयल इलेव्हन क्रिकेट संघ या क्रिकेट संघातर्फे गावातील अंगणवाडी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्ता प्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवरे येथे उत्साहात संपन्न झाला. Material distribution by Royal XI team
यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य, पालकवर्ग उपस्थित होते. श्री.संदीप भरणकर यांनी रॉयल इलेव्हन क्रिकेट संघा विषयी माहिती दिली. या क्रिकेट संघातर्फे अनेक आजारी व्यक्ती, गरजू व्यक्तींना मदत केली जाते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रामचंद्र गुरव, श्री. सखाराम गुरव, श्री. सुरेश गोताड, श्री.सुनील भरणकर श्री .यशवंत शितप (शिक्षणतज्ञ), सौ.सुचिता भरणकर (शा. व्य.समिती अध्यक्ष), सौ.शालिनी शितप (ग्राम.समिती सदस्य), सौ. कृतीका खळे(माता पालक संघ अध्यक्ष), श्रीम.वंदना जाधव याच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Material distribution by Royal XI team
या कार्यक्रमासाठी सौ.अपर्णा जाधव मॅडम (अंगणवाडी सेविका), सौ.धनश्री गोताड. (मदतनीस ), रॉयल इलेव्हन संघातील श्री.निलेश घुमे, श्री विशाल गोताड, श्री.मंगेश भरणकर, श्री.संदीप भरणकर उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा आवरे कडून रॉयल इलेव्हन क्रिकेट संघाला आभारपत्र देण्यात आले. सदर पत्र, कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा, मुख्याध्यापिका सौ.संध्या दिनेश नेटके, उपशिक्षिका सौ.संस्कृती वैभव ढवळ यांच्या हस्ते देण्यात आले. व सर्वांचे आभार मानण्यात आले. Material distribution by Royal XI team