उमराठ सरपंच, जनार्दन आंबेकर
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ नं.१ या शाळेमध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर, पदवीधर शिक्षक अनिल अवेरे त्याचप्रमाणे उपशिक्षक राजकुमार जगताप आणि नाना मोरे तसेच हेदवी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका बिर्जे मॅडम, तसेच आरोग्य सेवक अजय हळये, उमराठ गावातील आशा सेविका वर्षा गावणंग आणि रुचिता कदम मॅडम, अंगणवाडीच्या मदतनीस समृद्धी गोरीवले मॅडम या उपस्थित होत्या. Yoga Day at Umrath School
सदर कार्यक्रमाच्या वेळी सुरुवातीस आशा सेविका रुचिता कदम आणि वर्षा गावणंग यांनी सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या प्रात्यक्षिका संदर्भात माहिती दिली. हात धुण्याचे फायदे पटवून दिले. त्याचप्रमाणे आरोग्य सेविका बिर्जे मॅडम यांनी सद्या पावसाळा सुरू असल्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि त्यावरील उपाय या संदर्भात मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक अजय हळये यांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे सांगून घराच्या आजूबाजूला पाणी साचून देऊ नका असे ही सांगितले. Yoga Day at Umrath School
त्यानंतर शाळेचे पदवीधर शिक्षक आणि अनिल अवेरे यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. यावेळी ग्रामपंचायत उमराठचे सुद्धा उत्तम सहकार्य लाभले. शेवटी अनिल अवेरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. Yoga Day at Umrath School