भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांची प्रतिक्रिया
गुहागर, ता. 25 : रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीचा बालेकिल्ला असणारा गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. विनय नातू हेच पुन्हा लढवणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमचे पालक सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वीच हा विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी लढवणार असून डॉ.विनय नातू हेच या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणार असल्याचे जाहीर केले आहे, अशी प्रतिक्रिया गुहागर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी दिली. Natu Guhagar Assembly Constituency will contest
या विधानसभा मतदारसंघात गुहागर तालुक्यातील 140 बुथ, चिपळूण तालुक्यातील 92 आणि खेड तालुक्यातील 90 बुथचा समावेश होतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना या मतदारसंघातून पडलेली कमी मते याबाबतचे चिंतन करण्यासाठी आणि पुढील विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी या विधानसभेतील तिन्ही तालुक्यांमध्ये भाजपाच्या बैठका संपन्न झाल्या. या संपूर्ण विधानसभेला माहीत असणारा चेहरा आणि ज्या चेह-याला संपूर्ण विधानसभा माहित आहे असे डॉ. विनय श्रीधर नातू हे एकमेव व्यक्तिमत्व आहेत. त्यांना चार टर्मचा आमदारकीचा अनुभव आहे. यामुळे या गुहागर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा महायुतीच्या माध्यमातून डॉ. नातू हेच लढत देणार असल्याचे श्री. सुर्वे यांनी सांगितले. Natu Guhagar Assembly Constituency will contest
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गुहागर तालुक्यामध्ये झालेल्या मेळाव्यात “”कहो दिल से नातू फिरसे”” हा नारा देऊन डॉ. विनय नातू साहेबांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब केले आहे. हा मतदारसंघ पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीकडे आणण्यासाठी मंत्री रविंद्रजी चव्हाण त्याचबरोबर माजी खासदार डॉ. निलेश राणे, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायणराव राणे हे लक्ष देऊन आहेत. चार वेळा गुहागर विधानसभेचे नेतृत्व करत विरोधी पक्षात असतानाही या गुहागर विधानसभेमध्ये जे शाश्वत विकास काम नातू साहेबांकडून झालेले आहे. असे अभ्यासू व्यक्तिमत्त्व सत्तेच्या काळात विधानसभेचे पुन्हा एकदा नेतृत्व करणार असतील तर या गुहागर विधानसभेमध्ये विकासाची गंगा आणि रोजगाराचे नवे दालन निर्माण होणार असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी व्यक्त केला आहे. Natu Guhagar Assembly Constituency will contest