• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एसटी बस नेले वाहिनीसह वीजखांब ओढत

by Guhagar News
June 22, 2024
in Guhagar
250 2
0
ST bus hit the power pole
490
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पाटपन्हाळेतील थरारक प्रकार

गुहागर, ता. 22 : एसटी बसने सर्व्हिस वायरला तोडून तीन वीजखांब ओढत ती सुसाट निघून गेल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे घडला. यामुळे गेले दोन दिवस कोंडवाडी अंधारात होती. चालकाच्या या बेपर्वाइमुळे येथील ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले असून गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसान भरपाईची मागणी केल्याची माहिती शृंगारतळी महावितरणचे सहाय्यक अभियंता मंदार शिंदे यांनी दिली. ST bus hit the power pole

गुहागर आगारातून सकाळी ११ वाजता सुटणारी गुहागर-पेवे व्हाया पाटपन्हाळे ही विद्यार्थ्यांना शृंगारतळी शाळेत घेऊन येणारी एसटी बस पाटपन्हाळे कोंडवाडी येथे आली. या दरम्यान, ही बस पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे यांच्या घराजवळ आली असता रस्त्यावरुन एका घराकडे गेलेली वीजेची सर्व्हिस वायर व तीला जोडून असणारी जीआयची तार बेधडक ओढत नेली. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने उभे असलेले सिमेंटचा १ व लोखंडी २ असे ३ वीजखांब तुटले. एवढा प्रकार घडूनही एसटी चालक न थांबा तो बस सुसाट घेऊन गेला. दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तेथील काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. गेले दोन दिवस कोंडवाडीतील काही घरे वीजेअभावी अंधारात होती. दिवसभर मुसळधार पाऊस असूनसुध्दा महावितरणचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी येथे कामगार लावून वीजखांब उभे केले व वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे सुमारे ४० हजाराचे नुकसान झाले आहे. ST bus hit the power pole

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarST bus hit the power poleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share196SendTweet123
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.