गुहागर, ता. 22 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवनगर मराठी शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगा टीचर मुकुंद रोहीलकर उपस्थित होते. वेलदूर सरपंच दिव्याताई वनकर, उपसरपंच राजू शेठ जावळे, ग्राम विकास अधिकारी राजाराम कुळये, मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण कार्यक्रम झाला. Yoga Day at Veldur Nawanagar School
त्यावेळी अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड, धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ व ग्रामस्थ तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी योगाची आवश्यकता, योगाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की योग ही भारताची जगाला मिळालेली एक देणगी आहे. आपले आरोग्यमान चांगले राहावे म्हणून आपण नियमित योग साधना करायला हवी, तरच आपण दीर्घायुषी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी योगसाधना केल्यास विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता विकसित होऊ शकते. चांगले मानसिक स्वास्थ्य लाभते. आरोग्यमान सुधारते. त्यावेळी योगा टीचर मुकुंद रोहीलकर यांनी योगाविषयक विविध योग प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. Yoga Day at Veldur Nawanagar School
यावेळी योगा टीचर मुकुंद रोहीलकर म्हणाले की, योगाचे मानवी जीवनातील स्थान अनन्यसाधारण असे आहे. योग साधनेने आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते. हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये योगसाधना करणे ही काळाची गरज आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली मुद्दमवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदाने प्रयत्न केले. Yoga Day at Veldur Nawanagar School