अज्ञाताकडून 67.500 रुपयांची फसवणूक
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील एका ग्रामसेविकेला पतीचा मित्र असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार दि. 8 मे 2024 रोजी घडला असून तो 15 जून रोजी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. Fraud by unknown
गुहागर तालुक्यातील एका ग्रामसेविकेने फिर्याद दाखल केली आहे. ग्रामसेविका घरी असताना अमरेश कुमार या अज्ञात इसमाने 9565679092 या मोबाईल क्रमांकावरुन ग्रामसेविकेला संपर्क साधून तो पतीचा मित्र असल्याचे भासवले व विश्वास संपादन केला. तुमच्या पतीने माझ्या खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले आहे असे त्याने ग्रामसेविकेला सांगितले. याआधीही तुमच्या पतीने माझ्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले आहे तसे खोटे मेसेज त्यांनी ग्रामसेविकेला पाठवले. त्यानुसार, त्यांनी त्याच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले. ते मेसेज बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर एकूण 67 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामसेविकेने फिर्याद दाखल केली आहे. Fraud by unknown