गुहागर, ता. 13 : असोरे गावाचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख विश्वास गोपाळ गोंधळी यांचे गुरुवार दि. ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सक्रिय सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या. विश्वास गोंधळी हे शिवसेना शाखाप्रमुख असोरे शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांचा अंत्यविधी असोरे गावी करण्यात आले. Vishvas Gondhali is No More
विश्वास गोंधळी हे तब्बल १५ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. त्यामधील जास्तीत जास्त कार्यकाळ सरपंच म्हणून काम पाहिले. सद्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत होते. मुंबईमध्ये शिक्षण झाल्यानंतर गावात येऊन त्यांनी चिरेखाण व्यवसाय सुरू केला. अंत्यविधीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र आंबेकर, चिरेखान मालक संघटना तालुका अध्यक्ष भगवान कदम, चिरेखान मालक व्यापारी संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद घोणबरे, प्रशांत ट्रॅव्हल्सचे मालक प्रशांत आग्रे, अप्पा कदम, बाबुशेठ सुर्वे, राजा झोरे व विविध क्षेत्रातील मंडळ उपस्थित होते. Vishvas Gondhali is No More