गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या बीसीए(बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन)विभागातील कु.करीना पालशेतकर व कु. सोनिया वरवाटकर या विद्यार्थिनींची विप्रो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, अंधेरी (वेस्ट),मुंबई येथे निवड झाली आहे तसेच कु.वेदिका वाडावे, कु. साक्षी तोडणकर, कु.मिसबाह तुरूक, कु. नुजहत घारे, कु. पूजा धोपावकर ,कु. सानिका शिर्के, कु.आरती आलिम, कु.सायली बामणे व कु. गौरी घाणेकर या विद्यार्थिनींची क्यूस्पायडर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट, मुंबई येथे सिलेक्शन कमिटीद्वारे निवड करण्यात आली आहे. Regal College Shringartali
या सर्व विद्यार्थिनींचे रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सौ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे तसेच रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या सर्व प्राध्यापक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले आहे. रिगल कॉलेज, शृंगारतळी मध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठ संलग्न तीन वर्षे कालावधी असलेला बीसीए (बॅचलर ऑफकम्प्युटर एप्लीकेशन)हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनींना वेब डेव्हलपर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कम्प्युटर टीचर इ. पदांवर व जिथे कॉम्प्युटर आहे अशा सर्वच ठिकाणी विविध नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तरी आश्वासक नोकरी देणाऱ्या या कोर्ससाठी प्रवेश घेऊन विद्यार्थिनींनी आपले भविष्य सुनिश्चित करावे, असे आवाहन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांनी केले आहे. Regal College Shringartali