स्वच्छता समुद्रावर परंतु अस्वच्छता मुख्य मार्गावर
गुहागर, ता. 12 : शहरांमध्ये स्वच्छतेचा डंका फिटण्यात येत आहे. स्वच्छता अभियान समुद्रकिनारी राबवून त्याचे फोटोग्राफी होते मात्र प्रत्यक्षात गुहागर शहरातील मुख्यमार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्याचा प्रकार विकृत व्यक्तींकडून होत आहे यावर गुहागर नगरपंचायतीचा कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्याचबरोबर नगरपंचायतीमध्ये सक्षम अधिकारी हजर नसल्याने स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले पहावयास मिळत आहेत. Unsanitary in Guhagar Cities
शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात येते स्वच्छतेकरिता ठेकेदारी स्वरूपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे कर्मचारी केवळ शहर बाजारपेठेतील रस्ते सफाई चे काम करत आहेत उर्वरित भाग मात्र अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे. नगरपंचायतीने कोट्याने रुपयाची डम्पिंग ग्राउंड ची जागा घेतली आहे या मुख्य मार्गावर शहरातीलच विकृत व्यक्ती खुलेआम कचरा टाकत आहेत यावर कारवाई करण्याचे धाडस गुहागर नगरपंचायतीमध्ये नाही कारवाई करण्याकरिता सक्षम अधिकारीच नगरपंचायतीमध्ये नाही. Unsanitary in Guhagar Cities
अतिरिक्त कारभार लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षला राणे यांच्याकडे आहे. महिन्यातून एका दुसरी धावती भेट गुहागर नगरपंचायतीला होते यामुळे नगरपंचायतीचा कारभार सध्या सक्षम अधिकाऱ्यांना चालू आहे. परिणामी स्वच्छतेबाबत नगरपंचायतीने जागृती व घंटागाडी दिली असतानाही शहरातील नागरिकांवर कोणताही अंकुश राहिलेला नाही याच मार्गाने नगरपंचायतीच्या घंटागाड्या डम्पिंग ग्राउंड येथे जात असतात परंतु मुख्य रस्त्याला टाकलेला हा कचरा उचलण्याकरता वरिष्ठ आदेश देत नसल्याने हा कचरा सध्या शहराची ओळख बनली आहे. स्वच्छतेचा अभियानामध्ये मुख्य मार्गावरील अस्वच्छता पर्यटनासाठी मारक ठरले आहे नगरपंचायतीचे याकडे लक्ष जाईल का उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल का असा सवाल शहरातील नागरिक करत आहेत. Unsanitary in Guhagar Cities