गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवघर पेट्रोल पंपा समोर एका कारच्या भीषण अपघातात ड्रायव्हर सकट तीन जण जखमी झाल्याची घटना आज घडली. Car accident at Deoghar
सदरील कार गुहागर वरून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने निघाली होती. गाडी रस्ता सोडून दोन ते अडीच फूट खाली खड्ड्यांमध्ये जावून पेट्रोल पंपाच्या रस्त्याचा कठड्याला जोरदार आदळली. जर का ही गाडी पेट्रोल पंपाच्या दिशेने जर गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या अपघातामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन दोन वयस्कर प्रवासी यांच्या पायांना दुखापत झाली आहे. तर चालकहि जखमी झाला आहे. या तिघांनाही तात्काळ रामपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. Car accident at Deoghar