गुहागर, ता. 04 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली पासून ते देवघरपर्यंत काँक्रिटीकरणाला अजूनही मोठया प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून येत असून भरलेल्या भेगांनी पुन्हा तोंडे उघडली आहेत. तर काही ठिकाणी या भेगांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. Cracks on National Highway
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील भूसंपादन प्रक्रिया झाली असली तरी अजूनही प्रशासकीय पातळीवरील अनास्थेपोटी पुढील हालचाल थांबली आहे. मार्च महिन्यापर्यंत संबधीत जागा मालकांना रक्कम मिळेल. असे वारंवार सांगणारे चिपळूणचे प्रांताधिकारी यांनाही याचा विसर पडलेला दिसून येत आहे. तर राष्ट्रीय महामार्गाचे झालेल्या कामाच्या दर्जावर विचार करण्याची वेळ आली आहे. रात्रांदिवस राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष ठेवून आलेल्या या कामाचा दर्जा ढासळला कसा सवाल उठत आहे. मनिषा कन्स्ट्रक्शनने केलेल्या या महामार्गाचे काँक्रीटीकरण अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या स्थितीत दिसून येत आहे. तर दोन भागामध्ये केलेल्या काँक्रीटच्या मध्यावरील पडलेली गॅप व कमी अधिक उंचीमुळे दुचाकी अपघात होण्याचीही शक्यता आहे. Cracks on National Highway
चिखलीपासून ते देवघर पर्यंत मोठया प्रमाणात काँक्रीटला तडे गेले असून दिवसेंदिवस हे तडे आपली तोंड उघडत आहेत. तीन महिन्यापुर्वी काहीठिकाणीचे खराब काँक्रीट काढून ठिगळ भरण्याचे काम या ठेकेदाराने केले होते. एवढेच नव्हे तर तडे गेलेल्या भागामध्ये काँक्रीट भरले होते. ते काँक्रीट पुन्हा बाहेर आले असुन हे तडे अधिक वाढले आहेत. यामुळे या पावसाळयामध्ये हे काँक्रीट टीकेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी या निकृष्ठ कामाची दखल घेतील का, असेही बोलले जात आहे. Cracks on National Highway