• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अतिरिक्त वीजबील रद्द करा

by Mayuresh Patnakar
May 29, 2024
in Guhagar
126 2
0
Shiv Sena statement on electricity bill
248
SHARES
709
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शिवसेनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जनतेला आलेल्या वीज बीलांची वाढीव रक्कम तसेच अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करावी. अन्यथा गुहागर तालुकावासीयांना घेवून शिवसेना वीज कार्यालयावर धडक मोर्चा घेवून येईल. असे निवेदन आज गुहागर तालुका शिवसेनेतर्फे महावितरणच्या गुहागर व्यवस्थापकांना देण्यात आले. Shiv Sena statement on electricity bill

तालुक्यातील अनेक ग्राहकांना वाढीव बीले देण्यात आली आहेत. तसेच एकदा अनामत रक्कम वसुल केल्यानंतर पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने अतिरिक्त सुरक्षा रक्कमेचा अंतर्भाव महावितरणच्या बीलात करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जनतेतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पोचली. पदाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरण विद्युत महामंडळाच्या गुहागर व्यवस्थापकांची आज भेट घेतली. वाढीव वीज बीले आणि अतिरिक्त सुरक्षा अनामतबाबत व्यवस्थापकांना निवेदन दिले. Shiv Sena statement on electricity bill

या निवेदनात म्हटले आहे की, वाढीव वीज बीले कमी करण्यात यावीत. अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम रद्द करण्यात यावी. अन्यथा समस्त गुहागर तालुकावासीय वीज ग्राहकांना घेवून आपल्या वीज कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात येईल. तसेच गुहागर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल. तरी या निवेदनाचा विचार करुन त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. हे निवेदन देताना शिवसेना गुहागर तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे, गुहागर शहर प्रमुख निलेश मोरे, उपतालुका प्रमुख महेश जामसूतकर, विभागप्रमुख संदिप भोसले, राकेश साखरकर यांच्यासह युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते. Shiv Sena statement on electricity bill

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarShiv Sena statement on electricity billUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share99SendTweet62
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.