• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

by Manoj Bavdhankar
May 29, 2024
in Politics
90 1
0
Lok Sabha Election 2024
176
SHARES
504
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

14 टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी

रत्नागिरी, दि. 29 : 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात 20 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. Lok Sabha Election 2024

'Remove' Hoarding

मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. 265 चिपळूण विधानसभा मतदार संघात 336 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 345 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 267 राजापूरमध्ये 341 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात 332 मतदान केंद्र असल्याने 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघात 278 मतदान केंद्र असल्याने 20 फेऱ्यांमध्ये तर, 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 308 मतदान केंद्र असल्याने 22 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. Lok Sabha Election 2024

मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. Lok Sabha Election 2024

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLok Sabha Election 2024MaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.