• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात गहू व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध

by Manoj Bavdhankar
May 28, 2024
in Ratnagiri
67 1
0
जिल्ह्यात गहू व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध
131
SHARES
375
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 28 : नियंत्रक शिधावाटप व संचालनालय नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यात गव्हाच्या आणि तूर व उडिद डाळीच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात लागू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी दिली आहे. Restrictions on wheat and pulse stocks

घाऊक व्यापारी कमाल साठा ५०० टन, किरकोळ व्यापारी: प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी कमाल ५ टन मर्यादा, बिग चेन रिटेलरः प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी कमाल ५ टन व डेपोसाठी ५०० टन मर्यादा, प्रोसेसर मासिक स्थापित क्षमतेच्या ६०% मर्यादा प्रमाणे असेल. जिल्हा व तालुका प्रशासनास तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत व साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई आदेश देण्यात आले आहेत. आयातकांना कस्टम क्लिअरन्स दिनापासून ३० दिवसांपेक्षा अधिक साठा करता येणार नाही. मिलरसाठी मागील महिन्याचे उत्पादन / वार्षिकच्या १०% डाळींचा साठा ठेवण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. Restrictions on wheat and pulse stocks

डाळींचा साठा यावरील मर्यादेत असल्यास तसे उपभोगता मामले विभागाच्या https://tcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर साठा जाहीर करणे बंधनकारक आहे. तरी संबंधिताना ३० दिवसाच्या आत केंद्र शासनाच्या या संकेतस्थळावर साठा नियमित अद्यावत करणे / कळविणे आवश्यक राहील. जिल्हा पुरवठा विभाग व सर्व तहसील कार्यालय (पुरवठा विभाग) यांच्याकडून आकस्मिक तपासणी केल्या जात आहेत. जिल्ह्यातील अद्याप ज्या साठा धारक / व्यापाऱ्यांनी अद्याप संकेतस्थळावर नोंदणी केली नसल्यास तात्काळ नोंदणी करावी व प्रत्येक शुक्रवारी  माहिती साठा ऑनलाईन अद्यावत करण्यात यावा असेही आवाहन श्रीमती रजपूत यांनी केले आहे. Restrictions on wheat and pulse stocks

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarRestrictions on wheat and pulse stocksUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.