गुहागर, ता. 28 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सानिया मालाणी या मिरजोळी येथील नँशनल ज्युनियर काँलेजची विद्यार्थीनी चिपळूण तालुक्यात अव्वल ठरली. तसेच शृंगारतळीतील क्यूयस युनूस केळकर या विद्यार्थ्याने याच काँलेजमधून (९४ टक्के) गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल शृंगारतळी येथील ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. Sania is felicitated by the villagers
शृंगारतळी येथील सानिया अल्ताफ मालाणी ही मिरजोळी नँशनल ज्युनियर काँलेजमध्ये वाणिज्य शाखेत होती. तिला (९५.५०) टक्के गुण मिळाले. कठोर मेहनतीच्या बळावर तिने हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण गुहागर तालुक्यातून अभिनंदन करण्यात आले. Sania is felicitated by the villagers