भर उन्हात सुकविण्याच्या कामात मच्छीमार गुंतले, बंदी कालावधी उंबरठ्याशी
गुहागर, ता. 25 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीचा बंदी काळ जाहीर होताच मच्छिमारांची सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ उडाली आहे. पावसाळ्यात सुक्या मासळीच्या विक्रीतून उदरनिर्वाह सुरळीत चालवा म्हणून छोट्या मासळीची साठवणूक केली जाते. यंदा समुद्रात छोटी मासळी देखील अपेक्षेप्रमाणे मिळत असल्याने मच्छीमार समाधानी झाले आहेत. Running for storage of dried fish
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वादळी वाऱ्यापासून मच्छीमारांच्या संरक्षण व्हावे व समुद्रातील मत्स्य प्रजातीची बीज निर्मिती व्हावी म्हणून दरवर्षी दोन महिन्यांसाठी मासेमारीवर शासनाकडून बंदी घालण्यात येते. यंदा देखील १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंदी घालत आली आहे. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे समुद्रात जास्तीतजास्त फेऱ्या मारण्याकडे मच्छीमारांकडून भर दिला जात आहे. यावर्षी मासेमारी हंगामात जाळ्यात मोठ्या मासळी न लागल्याने मच्छीमार काहींअंशी निराश असल्याचे दिसून आले होते. आगामी पावसाळ्यात मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ऐन मासेमारी बंदी कालावधी जवळ आला असताना किमान छोटी मासळी भरभरून हाती लागत असल्यामुळे मच्छीमार सुखावले आहेत. Running for storage of dried fish
प्रामुख्याने मासेमारी बंदी कालावधीत मच्छीमार हे किनाऱ्यावर असतात. त्यामुळे इतर मासळी मिळत नसल्याने नागरिकांकडून सुक्या मासळीच्या मागणीत मोठी वाढ केली जाते. ही मागणी कोकणातील ग्रामीण भागाबरोबरच मुंबई, पुणेसारख्या शहरामध्ये खरेदी केली जाते. त्यामुळे या काळात साठवलेल्या मासळीला मच्छीमारांना चांगला भाव मिळत असतो. म्हणून समुद्रातून छोटी मासळी पकडून ती भर उन्हात सुखवण्याच्या कामात मच्छीमार गुंतले असल्याचे दिसून येत आहेत. Running for storage of dried fish