घाटकोपरमध्ये दुर्दैवी घटना
मुंबई, ता. 23 : मुंबई विमानतळावर उतरत असलेल्या एका विमानाची धडक लागून तब्बल ३९ फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगो मृत्युमुखी पडल्याची ही पहिलीच घटना आहे. राज्याच्या वन विभागाने याची चौकशी सुरू केली आहे. या घटनेबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. Flamingo dies in plane crash
राज्याच्या कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी यावर सविस्तर माहिती दिली आहे. घटनेची माहिती समजताच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहोचले. एकूण ३९ मृत फ्लेमिंगो वन विभागाने ताब्यात घेतले. मृत फ्लेमिंगो पक्षी ऐरोली येथील वन विभागाच्या किनारी व सागरी जैवविविधता केंद्रात नेण्यात आले आहे. या घटनेचा तपास कांदळवन विभागाचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे करीत आहेत. Flamingo dies in plane crash
मुंबई विमानतळावर विमाने उतरताना घाटकोपर परिसरातून जातात. त्यामुळे ही विमाने अतिशय कमी उंचीवरून उडत असतात त्यावेळी लँडिंगच्या वेळेला विमानाची धडक लागून फ्लेमिंगोंच्या या थव्यांचा मृत्यू झाला आहे. Emirat कंपनीच्या विमानाची धडक बसताच प्लेमिंगोंच्या शरीराचे तुकडे व पिसे घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, लक्ष्मीनगर, पंतनगर परिसरात आकाशातून पडली. रात्री ८.४० च्या सुमारास ही घटना घडली. हा अपघात नेमका कसा घडला ?, विमान कोणते होते ?ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. Flamingo dies in plane crash
नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण महासंचालकांकडे याबाबत तक्रार केली आहे. विमान उतरत असताना वैमानिकाला रडारवर फ्लेमिंगोच्या थव्याचे अस्तित्व जाणवले नाही का ?, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली. Flamingo dies in plane crash