गुहागर, ता. 22 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण यांनी सभासदांसाठी 15 टक्के लाभांश जाहीर केले असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी सांगितले आहे. ते श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. Annual meeting of Samarth Bhandari Sanstha
प्रभाकर आरेकर यांनी सांगितले की, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था चिपळूण या संस्थेला अ ऑडिट वर्ग मिळाला आहे. या संस्थेच्या एकूण 17 शाखा आहेत. तसेच लोटे, लांजा, पालशेत असे तीन नवीन शाखा सुरू करावयाचे मानस आहे. सुरुवातीला शेअर्स ठेव दोन लाख रुपयांची मर्यादा होती. ती आता वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. संस्थेसाठी स्व मालकीच्या जागा खरेदी करणे बाबत देखील विचार विनिमय सुरू असल्याचे शेवटी आरेकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर, सुहास भोसले ,अरुण पाटील, विजय जाधव, पराग आरेकर, दिलीप वानरकर, स्मिता आरेकर, प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर, उदय वेल्हाळ, सचिव संदीप राहटे व बँकेचे शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. Annual meeting of Samarth Bhandari Sanstha