गुहागर पंचायत समितीला महिलांचे निवेदन
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील तवसाळ तांबड (कुरटेवाडी) जल जीवन मिशन योजने मार्फत पूरक पाणीपुरवठा योजनेची माहिती मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. Jal Jeevan Mission Scheme
या निवेदनात म्हटले आहे की, तवसाळ तांबड (कुरटेवाडी) येथे जल जीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा व्हावा, या संदर्भात ग्रामपंचायतीमध्ये मागणी केल्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठाचे अधिकारी यांनी पाहणी करून गेले. सर्वेक्षणानुसार इस्टिमेट तयार करण्यात आले. परंतु, या पुढील योजनेचे कामकाजाविषयी माहिती मिळावी अशी मागणी केली. या विषयासंदर्भात गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. Jal Jeevan Mission Scheme
यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, या वाडीशेजारी तळी अस्तित्वात असून त्याद्वारे पर्याय म्हणून पाणीपुरवठा करावा किंवा तांबडवाडी नळपाणी योजनेतून या वाडीला पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी केली. कुरटेवाडीमध्ये एकूण २५ घरे असून येथील ग्रामस्थांना एका बोअरवेल मधून पाणीपुरवठा होत आहे. परंतु मार्च नंतर पाण्याची पातळी कमी होत असल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होते. या परिसरामध्ये तीन बोअरवेल असून दोन बोअरवेल या कोरड्या आहेत. फक्त एका बोअरवेल मधून २०० लोकवस्ती असलेल्या नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो. त्यामुळे भीषण पाणी समस्या लक्षात घेता ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी ग्रामस्थांची मागणी विचारात घेता त्वरित यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही असेही त्यांनी सांगितले. Jal Jeevan Mission Scheme
यावेळी ग्रामस्थांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, सुजित गांधी, रमेश कुरटे, दीपक कुरटे, संजय कुरटे, रमेश कुरटे, सार्थक घुमे, विनीता कुरटे, अंजनी कुरटे, सुनीता हुमणे, दर्शना हुमणे, करीना हुमणे, सुनीता हुमणे, शर्वरी कुरटे, वंदना कुरटे, कविता घुमे, पूजा कुरटे, प्रिया हुमणे, नमिता कुरटे आदी उपस्थित होते. Jal Jeevan Mission Scheme