गुहागर, ता. 20 : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती पात्र व इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालेल्या श्री देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर गुहागरची विद्यार्थिनी आर्या मंदार गोयथळे हिचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. या संस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी तिचा सत्कार करण्यात आला. Annual General Meeting
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती व ८ वी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आर्या हिने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मध्ये 228 गुण मिळवून गुहागर मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. म्हणून आर्या हिचा श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांग मित्र पुरस्कार प्राप्त पत्रकार मंदार गोयथळे याचा संस्थेचे संचालक पराग आरेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कर्मचारी म्हणुन महेश पवार व नितेश गोयथळे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. Annual General Meeting
या सभेला श्री समर्थ भंडारी नागरिक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष हेमचंद्र हळदणकर, संचालक दिलीप मयेकर ,सुहास भोसले, अरुण पाटील ,विजय जाधव ,पराग आरेकर, दिलीप वानरकर ,स्मिता आरेकर, प्रज्ञा नरवणकर, पल्लवी भाटकर ,उदय वेल्हाळ, सचिव संदीप रहाटे व सर्व शाखेचे शाखाधिकारी कर्मचारी , सभासद ,पालक उपस्थित होते. Annual General Meeting