पुलाचे ५० टक्के काम पूर्ण
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोस्टल मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील पुलाचे काम ५० टक्के पूर्ण झाले असून सदर काम पावसाळा सुरू होण्याअगोदर पूर्ण करणे. एकप्रकारे आव्हानच बनले आहे. या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. Palashet bridge work on war level
सार्वजनिक बांधकामच्यावतीने सुरू असलेल्या या पुलाच्या उभारणीकरीता बजेटमधून ३ कोटी रूपये मंजूर झाले आहेत. पुलाचे कामाचा शुभारंभ करताना खाडीमधीलच रेतीच्या सहाय्याने पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. गेल्या अडीच महिन्यात पुलाचे काम जलद गतीने झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. पुलाचे दोन स्लॅप पूर्ण झाले आहेत. उर्वरीत दोन स्लॅप शिल्लक आहेत. यामुळे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर पुल हा बाजारपेठेतील रस्त्यापेक्षा दोन ते अडीच मिटरने उंच तर ६७.८ मिटर लांब आहे. पुलाखालून पाणी जाण्यासाठी मोठी जागा असल्याने दरवर्षी पाणी भरण्याची निर्माण होणारी समस्या कायमची दूरू झाली आहे. Palashet bridge work on war level
मात्र सदर पुलाचे काम पावसाळयाअगोदर करणे आव्हानात्मक ठरले आहे. जर ५० टक्के कामाला दिड महिना लागला तर उर्वरीत ५० टक्के कामासाठी जास्त कालावधी शिल्लक राहत नाही. यामुळे पावसाळा सुरू होण्याअगोदर काम पूर्ण होणे गरजेचे बनले आहे. तर काम लवकरात लवकर पूर्ण करू, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक शाखा अभियंता योगेश थोरात यांनी व्यक्त केला आहे. Palashet bridge work on war level