एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून भेट
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.१ या शाळेस एएचबी विद्यार्थी विकास ट्रस्ट मुंबई यांचेकडून “मल्टीपर्पोज पार्टी स्पिकर” भेट देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठे स्पिकर, तिन माईक, एक एम्पलीफायर मशिन तसेच एक वायरलेस माईक कनेक्शन मशिन असे साहित्य देण्यात आले. Party Speaker gift to Kundali School
हे साहित्य कुडली नं.१ शाळेपर्यंत पोहचवण्यासाठी व मिळण्यासाठी कुंडली गावचे सुपुत्र श्री.बुध्दीराम रहाटे यांनी मोलाचे योगदान दिले. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल एएचबी विद्यार्थी ट्रस्ट आणि श्री.बुध्दीराम रहाटे यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे, उपाध्यक्ष सौ.दिक्षा प्रदिप सुर्वे यांचेसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधाकर निमकर, उपशिक्षक श्री.शाम पवार, श्री.दिपक कुनघाडकर, पदवीधर शिक्षक श्री.प्रकाश गुरसळे यांनी आभार मानले व धन्यवाद दिले. Party Speaker gift to Kundali School