गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा दिव्यांग मित्र पुरस्कार लोकमतचे पत्रकार मंदार गोयथळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनी दि. 04 मे रोजी संस्थेचे कार्यालय वरवेली येथे दुपारी 12 वाजता अनेक मान्यवर उपस्थित वितरण करण्यात येणार आहे. Divyang Mitra Award to Goythale
या कार्यक्रमाचे औचित्य साधून या संस्थेला किंवा दिव्यांग व्यक्तिना मदत करणाऱ्या व्यक्तिचा दरवर्षी दिव्यांग मित्र पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. या दिव्यांग मित्र पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी – मंदार चंद्रशेखर गोयथळे, गुहागर दै. लोकमत चे पत्रकार व श्री. संदेश हुमणे, गुहागर हे आहेत. त्यांना सदर कार्यक्रमात उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हास्तरीय सर्वसमावेशक वधु-वर सूचक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आलेले आहे. Divyang Mitra Award to Goythale
या संस्थेमार्फत सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी व सामान्य लोकांसाठी गेल्या २२ वर्षात अनेक उपक्रम राबविले आहेत व राबवत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी सतत कार्य करणारी ही एकमेव सेवाभावी संस्था आहे. या संस्थेला दिव्यांग आयुक्तालय पुणे यांचे दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी अधिकृत शासकीय नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आहे. या वधु-वर सूचक मेळाव्यामध्ये सर्व प्रकारच्या जाती धर्मातील दिव्यांग, विधुर, विधवा व सर्वसामान्य लोकांनी या जिल्हास्तरीय वधु-वर सूचक मेळाव्यामध्ये सहभागी होता येईल. सर्व दिव्यांग, विधुर, विधवा व सामान्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. सदरचा वधु-वर सूचक मेळावा पुर्णपणे मोफत असून तो सर्वांसाठी खुला आहे. सदरच्या मेळाव्यासाठी स्वखर्चाने उपस्थित रहायचे आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग, विधुर, विधवा व सर्व सामान्यांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केले आहे. Divyang Mitra Award to Goythale