सुनील तटकरे, महायुतीच्या मेळाव्यात एकजुटीचे दर्शन
गुहागर, ता. 15 : 1980 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी कुणबी समाज भवनासाठी भुखंड दिला. भाजपच्या आणि समाजाच्या मतांवर 6 वेळा जिंकून येणाऱ्या, एनडीएच्या सरकारमध्ये केंद्रात दोन वेळा मंत्री असणाऱ्या गीतेंनी काहीही केले नाही. मी खासदार झाल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबी समाज भवनाला 5 कोटी मिळवून दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने परत 7.50 कोटी दिले. मात्र खासदार म्हणून गीतेंनी एक रुपयाची मदत केली नाही. त्यांनी समाजासाठी कोणते भरीव काम केले ते जाहीरपणे सांगावे. असे प्रतिपादन रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते श्रुंगारतळी येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. Mahayuti meeting at Srungaratli
गुहागर विधानसभा मतदार संघातील चिपळूण व गुहागरमधील महायुतीचा मेळावा भवानी सभागृहात झाला. यावेळी तटकरे म्हणाले की, 2014 आणि नंतर 2019 मध्ये केंद्रात सरकार आल्यावर एनडीएच्या नेतृत्त्वातील मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था मजबुत केली. परराष्ट्र धोरणातून जगात मैत्रीपूर्ण संबध प्रस्थापित केले. देशाला विकसीत राष्ट्राच्यां रांगेत नेऊन बसवले. देश बळकट करण्याचा विश्र्वास पंतप्रधान मोदींनी दिला. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने देशाच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी एनडीए आघाडीसोबत जाण्याता निर्णय घेतला. आजच्या निवडणुकांमधील महायुती विरुध्द महाविकास आघाडीची लढाई आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढत आहोत. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे सर्व घटकपक्ष एकत्र येवून, एकदिलाने या लढाईत उतरले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता गावागावात जावून अब की बार 400 पार साठी, घड्यांळाला मत देण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे लोकसभा क्षेत्रातील सर्वाधिक मताधिक्याने आपण मला निवडून द्याल. असा विश्र्वास वाटतो. Mahayuti meeting at Srungaratli
खासदार म्हणून निवडून आल्यावर मुंबई गोवा महामार्ग, सागरी महामार्ग, ग्रीनफिल्ड हायवे, मच्छीमारांना सुविधा देणे, रोजगार निर्मिती, आरोग्य विषयक सेवांची उपलब्धता, सीआरझेड समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहे. महायुतीचा खासदार म्हणून सातत्याने आपल्या संपर्कात राहून केंद्रातील विषयांचा पाठपुरावा करेन. असे आश्वासन यावेळी सुनील तटकरे यांनी दिले. Mahayuti meeting at Srungaratli
या मेळाव्यात बोलताना भाजपचे माजी आमदार व विधानसभा प्रमुख डॉ. नातू म्हणाले की, गेल्या 6 निवडणुकीत गीतेंबरोबर काम केल्याने त्यांची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. येथील आमदार काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याला मतदानाची फुटपट्टी लावून कसे मोजतात ते ही सर्वांना माहिती आहे. निवडणूक व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, गुहागर विधानसभेतील महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. यावेळी लोकसभा क्षेत्रातील सर्वाधिक मताधिक्य गुहागर विधानसभा क्षेत्रातून आम्ही देवू. Mahayuti meeting at Srungaratli
या मेळाव्याला भाजप महिला मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्ष निलम गोंधळी, माजी आमदार मधुकर चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, उपाध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महायुतीतील घटक पक्षांचे सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. Mahayuti meeting at Srungaratli