गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वरवेली येथील आगरवाडी विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणाची महापुजा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. Shivjanmatsava at Varaveli
शिवजयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी गोपाळगड, अंजनवेल ते वरवेली आगरवाडी “शिवज्योत दौड”, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, श्री ग्रामदेवता हसलाई देवी पालखीची मिरवणूक, श्री सत्यनारायण महापुजा, वाडीतील मुलांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप, दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती, सुस्वर भजन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. Shivjanmatsava at Varaveli
या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, आरे सरपंच समित घाणेकर, प्रशांत विचारे, गुहागर नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सरपंच नारायण आगरें, पत्रकार गणेश किर्वे, तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार, तेलीवाडी अध्यक्ष दीपक किर्वे, मधुकर बारगोडे, ग्रामपंचायत सदस्य नरेश रांजाणे, श्रावणी शिंदे, संदीप पवार, सेजल शिंदे, शैलेश नारकर, अरूण रावणग, संतोष रांजाणे गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर रात्री श्री आई सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख (पर्शुराम वाडी मावळती) यांचे बहुरंगी नमन काल्पनिक वगनाट्य “एक धूर्त कावा” अर्थात “वणवा पेटला सुडाचा “कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आगरवाडी विकास मंडळ आणि आगरवाडी महिला मंडळ यांनी मेहनत घेतली. Shivjanmatsava at Varaveli