गुहागर, ता. 13 : सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असल्याने राजकीय ढोल सर्वत्र वाजू लागले आहेत. नुकतीच रामदास कदम यांची सभा होऊन गेली. रामदास कदम यांच्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उद्या श्रृंगारतळी १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सभा होणार आहे. Uddhav Thackeray’s meeting
गुहागरमध्ये सध्या चांगलेच राजकारण तापू लागले आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक नेत्यांनी गुहागरमध्ये सभा घेतल्या. प्रत्येक पक्षाचे नेते आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोप प्रत्यारोप सर्वत्र होत आहे. जास्तीत जास्त – कार्यकर्त्यांचा मॉब मेळाव्याला दाखवून आपला पक्ष किती मोठा आहे. आपल्या तालुक्यात आपली ताकद किती आहे हे वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न सर्वत्र होत आहेत. काही नेते नवीन मैदानाचा वापर करतात तर काही नेते जुन्याच मैदानावर खेळू इच्छितात. Uddhav Thackeray’s meeting
उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या मेळाव्यासाठी हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी लोटणार आहे. उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता आरजीपीपीएल कंपनीमध्ये येणार असून १२ वाजता कार्यक्रम स्थळी शृंगारतळी येथे पोहोचणार आहेत. यावेळी मा. खासदार अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सचिन बाईत, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खेड चिपळूणचे तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख शहर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. Uddhav Thackeray’s meeting