• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सार्वजनिक शौचालय दुरुस्ती कामात अपहार

by Ganesh Dhanawade
March 11, 2024
in Guhagar
188 2
0
Embezzlement in toilet repair work

पत्रकार परिषदेत बोलताना माजी सरपंच यशवंत बाईत

370
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अंजनवेल येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांचा आरोप

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीने कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील १५ वा वित्त आयोगातील निधीतून सार्वजनिक शौचालय दुरूस्तीच्या कामामध्ये सरपंच, ठेकेदार, उपअभियंता, ग्रामसेवक यांनी संगनमताने निधीची लूट करत अपहार केला आहे. त्यांच्यावर कारवाई कारावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नोंदणी रद्द करावी, अशी मागणी येथील माजी सरपंच यशवंत बाईत यांनी केली आहे. Embezzlement in toilet repair work

माजी सरपंच यशवंत बाईत यांनी अंजनवेल बोरभाटलेवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे सर्व पुरावे सादर करत आरोप केले आहेत. तर याबाबत कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडेही केली असल्याचे त्यांनी माहीती देताना सांगितले. अंजनवेल ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोगाच्या सन २०२१-२२ च्या आराखडयात बंदीत निधीतून कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालय दुरूस्तीसाठी सुमारे ३ लाख ५७ हजार रूपये व मौजे अंजनवेल येथील शौचालय दुरूस्तीसाठी ३ लाख ५९ हजार रूपयांची तरतुद केली होती. यातील दोन्ही कामांची अंदाजपत्रक ग्रामिण पाणी पुरवठा उपअभियंता मंदार छत्रे यांनी बनविले. सदर दुरुस्तीचे काम गोपाळगड कन्स्ट्रक्शनचे समीर धामणस्कर यांना १२ टक्के व ११.२५ टक्के कमी यांना मिळाले. सदर काम ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण झाल्याने येथील सरपंचांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी कामाची पहाणी करून अंतिम मुल्यांकन करण्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्राने कळविले. Embezzlement in toilet repair work

दरम्यान, याअगोदर आपण कातळवाडीतेर्फ अंजनवेल व मौजे अंजनवेल याठिकाणी मोठे शौचालय नसून दुरूस्तीला मोठया प्रमाणावर निधीची गरज नसल्याने सदर कामाची चौकशी करून मुल्यांकन करण्यात यावे. अशी गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. याबाबत गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवीले होते. परंतु त्यानंतर याबाबत कोणतेच उत्तर दिले गेले नाही. आणि मुल्यांकन करून रक्कम वितरीत करण्यात आली. केलेल्या कामामध्ये ज्याठिकाणी शौचालयावर जीआयचे पत्रे वापरण्याचे लिहीले होते, त्याठिकाणी सिमेंटचे पत्रे वापरण्यात आले आहेत. दरवाजाच्या चौकडी बदललेल्या नाहीत, शौचालयाचे भांडे बदलले नाही, सर्व प्लास्टर केलेले नाही. मात्र या सर्वांचा खर्च दाखवून निधी काढण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालयाचे मोजमा नोंदवहीत कामांचे मोजमाप स्वतंत्रपणे दाखवून एकूण २ लाख ५४ हजार ८६५ रूपये २७ पैसे दाखवीले आहेत. तर मौजे अंजनवेल मधील मोजमाप नोंदवीत कामाचे मोजमाप १ लाख ८० हजार ५१८ रुपये ०४ पैसे दाखवीले आहे. मात्र कातळवाडीतर्फे अंजनवेल येथील शौचालय कामाचे मोजमाप घेताना एकूण मुल्यांकन रक्कमेत सुमारे ७० हजाराने जादा रक्कम दाखवून १५ वा वित्त आयोगातून सरपंच, ठेकेदार समीर धामणस्कर, उपअभियंता श्री. छत्रे व ग्रामविकास अधिकारी श्री. कुळे यांनी संगनमताने रक्कम लुटले आहेत. Embezzlement in toilet repair work

Tags: Embezzlement in toilet repair workGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share148SendTweet93
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.