विद्यार्थी गुणगौरव, हळदी कुंकू समारंभाचे आयोजन
गुहागर, ता. 07 : तेली समाजोन्नती संघ, चिपळूण, गुहागर यांच्या वतीने महाशिवरात्री स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन उद्या शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, श्री संताजी जगनाडे महाराज चौक, चिवडा गल्ली, लालबाग – मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे. Meeting of Teli Samojonnati Sangh
महाशिवरात्री स्नेहसंमेलनाचे हे १०३ वे वर्ष आहे. ज्येष्ठ समाजसेवक मोहन रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गणेश महादेव रहाटे, दिलीप सिताराम झगडे, उद्योजक पंढरी किर्वे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, मुंबई अध्यक्ष विलास त्रिंबककर, कार्याध्यक्ष संतोष रहाटे, झोंबडी सरपंच अतुल लांजेकर, उद्योजक शिवराम झगडे, बबन किर्वे, गजानन महाडिक, विश्वेश्वर सहकारी पतपेढी मुंबईचे अध्यक्ष दिलीप केळंबेकर, तेली समाज मुंबईचे अध्यक्ष किशोर रसाळ, उत्तर रत्नागिरी भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष संतोष जैतापकर, कोकण स्नेही संपादक सुरेश पडवळकर, माजी नगरसेविका वैशाली किर्वे, वझे केळकर महाविद्यालय मुलुंड चे प्रा.अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. Meeting of Teli Samojonnati Sangh
तेली समाजोन्नती संघ, चिपळूण, गुहागर यांच्या वतीने उमरोली घोणसरे या ठिकाणी समाज भवन बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महाशिवरात्री स्नेहसंमेलनात प्रकाश संप्रदाय यांचे भक्ती संगीत, शिवपिंडी पूजन, मान्यवरांचे मनोगत, हळदी कुंकू समारंभ, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वागत समारंभ, विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित रहावे आणि हळदी कुंकू समारंभासाठी महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष नरेंद्र झगडे आणि पदाधिकारी यांनी केले आहे. Meeting of Teli Samojonnati Sangh