• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अंधेरी पूर्व येथे महामातांची जयंती

by Guhagar News
March 5, 2024
in Bharat
154 2
1
Mahamata Jayanti at Andheri
303
SHARES
867
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 05 : विलेपार्ले – अंधेरी पूर्व विभागातील बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ महिला मंडळ यांच्या विद्यमाने महामातांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष पारमि प्रोडक्शन मुंबई दिपाली पवार प्रस्तुत टीव्ही कलाकार, सूत्रसंचालक रविंद्र पवार यांच्या माध्यमातून ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना प्रबोधनात्मक प्रश्न विचारून विविध बक्षिसे व विजेत्यांना पैठणी  देण्यात आली. Mahamata Jayanti at Andheri

कार्यक्रमाची सुरुवात गटाचे बौद्धाचार्य विश्वास सावंत व चंद्रकांत जाधव यांनी बुद्ध वंदनेने केली. सदर कार्यक्रम गटाच्या महिला अध्यक्षा सुनीता सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून राजेंद्र भालेराव (सीआयएसओ ) व  बौद्धजन पंचायत समिती, गट क्र. २४ चे अध्यक्ष सदाशिव जाधव, सचिव स्वप्नील कळंबे, कोषाध्यक्ष धम्मेश जाधव, हिशोब तपासणीस सचिन शिंदे, माजी गट प्रतिनिधी सिद्धेश्वर कासारे, माजी अध्यक्ष रामदास पवार, बी.जी. पवार तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत धोत्रे, के. डी. मोरे, वसंत ससाणे, सुधाकर जाधव तसेच गटांतर्गत येणाऱ्या विविध शाखांचे महिला पुरुष पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. Mahamata Jayanti at Andheri

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती उत्सव मंडळाच्या महिला सचिव शिल्पा तांबे यांनी केले. महिला उपाध्यक्षा मनिषा पवार, महिला उपाध्यक्षा भरती धोत्रे, महिला सचिव सरोज जाधव, महिला सह सचिव अनघा जाधव, महिला कोषाध्यक्षा नम्रता पवार यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. Mahamata Jayanti at Andheri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMahamata Jayanti at AndheriMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share121SendTweet76
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.