एकाचा मृत्यू झाल्याची घटना
गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट बाग येथील अवघड वळणावर एसटी आणि दुचाकी यामध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार तिघेजण जबर जखमी होऊन यामध्ये रानवी येथील शुभम सुभाष कदम वय 20 राहणार रानवी या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. Accident at Guhagar Bagh
गुहागर आगारांमधून सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांची सुटणारी गुहागर अंजनवेल वेलदूर धोपावे जेटी ही एसटी गुहागर वेलदुर या मार्गावरून जात असता बाग येथे जांभळादेवी येथील अवघड वळणावर आली असता दुचाकीवरून येणारे हे तिघेही गाडी समोरूनच स्लीप होऊन एसटीच्या समोरील भागावर जोरदार आदळले. यावेळी मयत शुभम सुभाष कदम हा दुचाकी चालवत होता .त्याला जबर मार बसलेला होता. मयत शुभम कदम आणि त्याचे मित्र साहिल नरेश पवार वय 20 राहणार रानवी, प्रणव प्रमोद मोहिते वय 19 राहणार त्रिशूल साखरी हे तिघेही एस पी शाईन या दुचाकीवरून रानवी ते गुहागर असा प्रवास करत होते. Accident at Guhagar Bagh
या अपघातावेळी रानवी कडून येणाऱ्या रिक्षाने तातडीने तिघांनाही रिक्षामध्ये बसून गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतू शुभम कदम याला छातीला जबर मार बसल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी प्रयत्न केला परंतु प्राथमिक उपचार घेत असतानाच शुभम कदम याचा मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदनासाठी चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले तर साहिल पवार, प्रणव मोहिते यांच्यावर गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. Accident at Guhagar Bagh