• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत ४ मार्चला हिंदू जन आक्रोश मोर्चा

by Guhagar News
March 1, 2024
in Old News
204 2
0
Hindu Jan Morcha in Ratnagiri
400
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सकल हिंदू समाजाच्या बैठकीत निर्णय

रत्नागिरी, ता. 01 : येत्या ४ मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमुक्त रत्नागिरी, भूमी अतिक्रमण, लव्ह जिहादमुक्त, रत्नागिरी चलो रत्नागिरी असा नारा या वेळी देण्यात आला. हा मोर्चा सकाळी १०.३० वाजता शिवतीर्थ, मारुती मंदिर येथून चालू होणार आहे. जयस्तंभ येथे प्रमुख वक्त्या काजल हिंदुस्थानी मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाकडून निवेदन देऊन समारोप होईल. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सकल हिंदू समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. Hindu Jan Morcha in Ratnagiri

या बैठकीला सकल हिंदू समाजाचे ८० प्रतिनिधी उपस्थित होते. या मोर्चाला जास्तीत जास्त हिंदू उपस्थित राहतील, याचे नियोजन करण्यात येत आहे. बैठका, हँडबिल, भित्तीपत्रके, बॅनर, रिक्षा अनाऊन्समेंट तसेच प्रसारमाध्यमाच्या मदतीने हा मोर्चाचा प्रसार करण्याचे ठरले. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हिंदूंच्या संघटित शक्तीचे प्रदर्शन रत्नागिरीत करावेच लागेल, असा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. Hindu Jan Morcha in Ratnagiri

रत्नागिरीत शासकीय ग्रंथालयाच्या जागेत असणारे अनधिकृत बांधकाम जिल्हधिकाऱ्यांनी पाडण्याचे आदेश दिले असताना  प्रशासन टाळाटाळ का करते? राजापूर पन्हळे येथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे. शिरगांव, आडी येथेही भूमी अतिक्रमण सुरू आहे. रत्नदुर्ग किल्ल्यावर रेखांकन करून सरकारी भूमीवर अतिक्रमण केले आहे. हिंदूंच्या जमिनी बळकावणारे  विभागिय वक्फ बोर्डास रत्नागिरीत मान्यता का दिली जाते, याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आलेल आहे. या मोर्चात सर्व हिंदू बांधवानी, माता, भगिनींनी आपले राष्ट्र आणि धर्म कर्तव्य समजुन बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे. Hindu Jan Morcha in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHindu Jan Morcha in RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.