तब्बल ४ तास एकाच जागी बस उभी; सचिन बाईत यांनी व्यक्त केली नाराजी
गुहागर, ता. 10 : आगार नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. असाच एक प्रकार मुंबई – तवसाळ एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ओढवला. मुंबईतून गावी आल्यावर एस.टी.च्या डिक्कीमध्ये या प्रवाशांचे सामान तब्बल ४ तास काढता आलं नव्हतं. त्यामुळे गाडी एकाच जागी उभी राहिली होती. या अनागोंदी कारभाराची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू होती. The strange administration of Guhagar Agra
मुंबईतून तवसाळकडे जाण्यासाठी मुंबई तवसाळ गाडी नं. MH – 14 B T 2729 हि गाडी शुक्रवारी सकाळी आबलोली येथे आली. सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत एस.टी.ची डिक्की उघडण्याचा केविलवाणा प्रयत्न चालक – वाहक आणि प्रवासी करीत होते. त्यावेळी मुंबईहून आलेले काही प्रवासी उतरले. त्यांच्या सोबत आणलेले त्यांचे सामान हे एसटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते ते काढण्यासाठी त्यांनी गाडीची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिक्की काही उघडेना. अनेक प्रयत्न करूनही डीक्की न उघडल्याने गुहागर आगार प्रमुखांच्या कानावर हि गोष्ट घालण्यात आली. त्यावेळी गुहागर आगारातून अजब उत्तर ऐकायला मिळाले ते म्हणजे ती बस गुहागर मध्ये आणून डेपो मध्ये जमा करा. आपण या ठिकाणी गाडीची डिक्की खोलून देऊ. The strange administration of Guhagar Agra

एस.टी.महामंडळ आणि गुहागर आगाराच्या या अजब आणि गजब कारभाराची चर्चा सध्या गुहागर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे. या प्रकाराबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी नाराजी व्यक्त करुन प्रवाशांची आस्थेने चौकशी केली. एसटीच्या अधिका-यांना जागेवर येऊन बसची डिक्की उघडून देण्यास सांगितले. The strange administration of Guhagar Agra
