चतुरंग प्रतिष्ठान मार्फत दि. 28 रोजी प्रदान
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली या प्रशालेचा विद्यार्थी कुमार श्रेयस सतीश विचारे (इयत्ता ९वी) याला सन 2023-24 चा चतुरंग प्रतिष्ठान मार्फत देण्यात येणारा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार रविवार दि. 28 रोजी प्रदान करण्यात आला. Student Godbole Award to Shreyas Vichare
सदर पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते श्री.मोहन जोशी, प्रमुख वक्ते डॉक्टर सागर देशपांडे व पुरस्कार निवड समितीमधील श्री. मुकुंद कानडे, प्राध्यापिका सौ. सोनाली खर्चे व चतुरंग प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारीउपस्थित होते. Student Godbole Award to Shreyas Vichare
इयत्ता दहावी नंतर पुरस्कार प्राप्त विद्यार्थी श्रेयस विचारे याला डाटा सायन्स मध्ये करिअर करायचे आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुस्तके व एक हजार रुपये रोख असे आहे. श्रेयस विचारे याला विद्यालयाचे शिक्षक श्री.वैभव ढवळ यांचे मार्गदर्शन लाभले. सतिश विचारे याचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.डि.डी.गिरी लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष व लोकनेते श्री.चंद्रकांतशेठ बाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिनशेठ बाईत यांचेसह सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Student Godbole Award to Shreyas Vichare