पारिजात पांडे; ज्युडिशिअल सर्विस उपक्रमात भाग घेण्याचे आवाहन
रत्नागिरी, ता. 31 : महाराष्ट्रातल्या सर्व, विशेषतः तालुका स्तरावर वकिल बंधू-भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. इमारत, वकिलांसाठी सोयीसुविधा, महिला भगिनींच्या बैठक व्यवस्था, अन्य सोयीसंदर्भात माहिती घेऊन त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. बार कौन्सिलतर्फे वकिलांसाठी विमा व वेल्फेअरच्या योजना पोहोचवत आहे. ज्युडिशिअल सर्विस अॅज ए करिअर या उपक्रमात नवोदितांनी भाग घेऊन न्यायव्यवस्थेत योगदान द्यावे, असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी केले. Workshops, Seminars through Bar Council
रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या सेवासदनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, बार कौन्सिलमार्फत वर्कशॉप, सेमिनार सुरू आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे व प्रशिक्षित व्हावे. वकिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. राहुरी येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणाऱ्या सौ. व श्री. आढाव दांपत्याच्या हत्त्येबाबत कौन्सिलने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. समाजाप्रती सेवाभावी दायित्व नजरेसमोर ठेवून व्यवसाय करणाऱ्या अधिवक्ता बंधू-भगिनिंच्या सुरक्षिततेचे दृष्टीने अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यात यावा यासाठी बार कौन्सिलचे प्रयत्न सुरू आहेत. Workshops, Seminars through Bar Council
बार कौन्सिलचे कामकाज मराठीत चालावे, बार कौन्सिलच्या वतीने प्रदान करण्यात येणारी सनद मराठीत असावी, भारतीय संविधानातिल अनुच्छेद 348 [2] नुसार मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला दर्जा प्रदान करण्यात यावा, यासाठी मी सादर केलेल्या प्रस्तावाला एकमताने मान्यता मिळाल्याचे पारिजात पांडे यांनी सांगितले. महिला वकीलांची वाढती संख्या विचारात घेऊन वकिल भगिनींच्या कर्तृत्व, नेतृत्व गुणास वाव मिळावा व बार कौन्सिलमध्ये त्यांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून बार कौन्सिलच्या २५ जागांपैकी किमान ५ जागा महिला वकिलांसाठी राखीव करण्यात याव्या. त्यानुसार कायदेशिर तरतुद करण्यासाठी पारिजात पांडे यांनी बार कौन्सिलसमोर प्रस्ताव मांडला आहे, तो मुंबई येथे एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे. याबाबत रत्नागिरीतील महिला वकिलांनी आनंद व्यक्त केला. Workshops, Seminars through Bar Council
यावेळी व्यासपीठावर बार कौन्सिलचे सदस्य संग्राम देसाई, अधिवक्ता परिषद कोकण प्रांत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप धारिया उपस्थित होते. त्यांनी पांडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी संग्राम देसाई यांनी सांगितले की, श्री. पांडे नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष झाल्यापासून ते महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये जाऊन वकिल मंडळींना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. परंतु श्री. पांडे अध्यक्ष झाल्यामुळे शासन, प्रशासन व बार कौन्सिलमध्ये समन्वयाचा दुवा बनले आहेत. संग्राम देसाई यांनी सांगितले की, वकील अॅकॅडमीकरिता कळवा (ठाणे) येथे 5 एकर जागा बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला मिळण्याकरिता प्रयत्न केले. लवकरच येथे कामाला सुरवात होईल. अॅडव्होकेट वेल्फेअर फंडाची रक्कम रुपये 30,000/- इतकी आहे. ती रुपये 3,00,000/- इतकी 2015 मध्ये होऊन देखील अंमलबजावणी केली जात नव्हती. पारिजातजी पांडे यांनी उपमुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन तो विषय मार्गी लावला आहे. Workshops, Seminars through Bar Council
१०८ तालुका असोसिएशनला भेट
अॅड. भाऊ शेट्ये म्हणाले की, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष यापूर्वी फक्त निवडणूक प्रचारासाठी येत असत. वकीलांना भेटणे, संवाद साधणे यासाठी यापूर्वी एकही अध्यक्ष फिरताना दिसत नाहीत. परंतु पारिजात पांडे यांनी दोन महिने आणि १२ दिवसांत आजपर्यंत ३०९ पैकी १०८ तालुका बार असोसिएशनला भेट दिली आहे आणि तेथील वकील वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. Workshops, Seminars through Bar Council