गुहागर, ता. 23 : गुहागरमधील प्राध्यापक मनाली बावधनकर यांच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर कथासंग्रहाला मायबाप साहित्य प्रतिष्ठान टेंभुर्णी, सोलापूर यांचा 2022- 23 साठीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ फेब्रुवारी, 2024 मधे होणार आहे. असे संस्थेचे सचिव – श्री. विनोद तांबे यांनी मायबाप प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर केले. Award announced for Bavdhankar’s collection of stories
मायबाप साहित्य प्रतिष्ठान टेंभुर्णी यांचे वतीने काव्यसंग्रह, कथासंग्रह, कादंबरी व ललित लेखन या साहित्य प्रकारात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रतिष्ठानचे चेअरमन शंतनु उंट, सचिव विनोद तांबे व पदाधिकारी यांचेकडून आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, कोल्हापूर, जालना, बुलढाणा, ठाणे, नाशिक, रत्नागिरी इथून अनेक साहित्यकृती प्राप्त झाल्या होत्या. याचा अंतिम निकाल संयोजन समितीनकडून सर्वानुमते जाहीर करण्यात आला. यात कादंबरी विभाग – हेडाम. लेखक – नागू विरकर. कथासंग्रह विभाग– बाईपणाच्या उंबरठ्यावर. लेखिका – सौ. मनाली बावधनकर. कविता संग्रह विभाग – सांजार्थ. कवी – प्रताप वाघमारे, सिझर न झालेल्या कविता कवी – डॉ. सुनिल पवार. ललित लेखन विभाग – जीवनाचा उपासक कर्मवीर लोहकरे गुरुजी. लेखक – इंद्रजीत पाटील यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. Award announced for Bavdhankar’s collection of stories