रिगल कॉलेज, शृंगारतळी
गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज, शृंगारतळी मधील शासन मान्यता प्राप्त डी एम एल टी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४-ब अन्वये आता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे पॅरामेडिकल्सची नोंदणी होण्यास परवानगी मिळाली आहे. यानुसार आता डी एम एल टी कोर्स पूर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू करू शकतात तसेच परदेशी आरोग्य क्षेत्रात नोकरी करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध देशात रोजगारांच्या तसेच स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे. Paramedical Council Registration for DMLT Course
रिगल कॉलेज, शृंगारतळीमध्ये हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग, बीसीए, बीबीए या व्यावसायिक कोर्सेससोबतच दोन वर्षे कालावधी असलेला डीएमएलटी (डिप्लोमा इन मेडिकल अँड लॅब टेक्निशियन) हा शासन मान्यता प्राप्त कोर्स सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना रक्ताच्या विविध चाचण्या, मायक्रोबायोलॉजी अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांची माहिती इत्यादी गोष्टी शिकविल्या जातात. Paramedical Council Registration for DMLT Course
सामाजिक बांधिलकी जपत रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या डीएमएलटी विभागामार्फत यावर्षी सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी केली गेली आहे. तसेच जनजागृतीसाठी ‘रक्तदानाचे महत्त्व’ या विषयावर विविध ठिकाणी पथनाट्ये सादर केली गेली आहेत. विविध ठिकाणी रोजगार तसेच स्वयंरोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या कोर्ससाठी प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांनीआपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य सौ. रेश्मा मोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज, शृंगारतळी, तौहिद मॉल, गुहागर- विजापूर रोड. मो. ७०६६३८४२०० येथे संपर्क साधावा. Paramedical Council Registration for DMLT Course